YouTube2Text

शेतातील रस्ता कोणाचा? | जुनी वहिवाट की बेकायदेशीर रस्ता? — Transcript

by कायद्याची बाराखडी ⚖️ · 1,600 words · 265 segments · language en · Watch on YouTube

Full transcript

  1. 0:00शेजारच्या रस्ता तुमच्या शेतातून जातोय
  2. 0:02का? मित्रांनो मग आजचा विषय हा
  3. 0:04तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण
  4. 0:06गावागावात सर्वात जास्त भांडणे जर कोणत्या
  5. 0:09कारणाहून होत असतील तर ते शेताच्या
  6. 0:11रस्त्यावरून होतात. अनेक वेळा दोन भाऊ
  7. 0:13एकमेकांचे शत्रू होतात. अनेक वेळा
  8. 0:15नातेवायकांमध्ये कायमची दुश्मनी तयार
  9. 0:18होते. अनेक वेळा कोर्टात 20-20 वर्षे केस
  10. 0:20चालतात आणि अनेक शेतकरी फक्त एका
  11. 0:23रस्त्यामुळे मानसिक त्रास सहन करतात. काही
  12. 0:25वेळा शेतात उभे पीक असताना ट्रॅक्टर घालून
  13. 0:28रस्ता काढला जातो. काही वेळा जबरदस्तीने
  14. 0:31बांध तोडले जातात काही वेळा विहिरी जवळून
  15. 0:34रस्ता काढला जातो काही वेळा रातोरात
  16. 0:37जेसीबी आणून माती काढली जाते आणि नंतर
  17. 0:39शेतकरी महसूल कार्यालय पोलीस स्टेशन कोर्ट
  18. 0:42या सगळीकडे चक्रा मारत बसतो पण आता
  19. 0:45परिस्थिती बदलत आहे कारण 20 एप्रिल 2026
  20. 0:48च्या ऐतिहासिक निर्णयानंतर शेत
  21. 0:50रस्त्यांच्या बाबतीत खूप मोठे नियम स्पष्ट
  22. 0:52झाले आहेत आता कोणालाही उटसूट दुसऱ्याच्या
  23. 0:55शेतातून रस्ता घेता येणार नाही आता फक्त
  24. 0:58गावात लोक म्हणतात म्हणून रस्ता मंजूर
  25. 1:00होणार नाही. आता फक्त जुनी पायवाट आहे
  26. 1:03म्हणून कायमचा कायदेशीर हक्क तयार होणार
  27. 1:05नाही. आता महसूल अधिकाऱ्यांनाही नियम
  28. 1:08पाळावे लागणार आहे आणि चुकीचा रस्ता मंजूर
  29. 1:11केल्यास तहसीलदारांवर सुद्धा थेट कारवाई
  30. 1:13होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी
  31. 1:16हा विषय समजून घेणे खूप गरजेचे आहे. कारण
  32. 1:18अज्ञानामुळे अनेक लोक स्वतःच्या जमिनीचे
  33. 1:21नुकसान करून घेतात आणि नंतर आयुष्यभर
  34. 1:23पश्चाताप करतात. मित्रांनो सर्वप्रथम एक
  35. 1:26गोष्ट लक्षात घ्या तुमची जमीन म्हणजे
  36. 1:29तुमची मालमत्ता आहे ती तुमच्या वडिलांची
  37. 1:31आजोबांची पिढ्यान पिढ्यांची कमाई आहे आणि
  38. 1:34कायद्यानुसार कोणालाही तुमच्या
  39. 1:36परवानगीशिवाय तुमच्या जमिनीचा वापर
  40. 1:38करण्याचा अधिकार नसतो. जोपर्यंत कायद्याने
  41. 1:41स्पष्ट परवानगी दिलेली नसते पण गावाकडचे
  42. 1:44वास्तव वेगळे आहे. पूर्वीच्या काळात गावात
  43. 1:46व्यवस्थित रस्ते नव्हते. लोक पायवाटांनी
  44. 1:49शेतात जात होते. अनेक जण एकमेकांच्या
  45. 1:52शेतातून एजा करत होते तेव्हा भांडणे कमी
  46. 1:55होती, लोकसंख्या कमी होती, गाड्या कमी
  47. 1:57होत्या आणि शेतीचे स्वरूप वेगळे होते. पण
  48. 2:00आता परिस्थिती बदललेली आहे. आता
  49. 2:02प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आहे, चार चाकी आहे
  50. 2:05प्लॉटिंग सुरू आहे. जमिनीचे भाव वाढले
  51. 2:07आहेत. त्यामुळे रस्त्याला खूप मोठी किंमत
  52. 2:10आली आहे. कारण त्या जमिनीला रस्ता असतो
  53. 2:12त्या जमिनीची किंमत अनेक पटीने वाढते
  54. 2:15म्हणून अनेक लोक नवीन रस्ते मिळवण्यासाठी
  55. 2:17प्रयत्न करतात. काही वेळा शेजारच्यावर
  56. 2:20दबाव टाकतात काही वेळा राजकीय ओळखी
  57. 2:22वापरतात काही वेळा महसूल अधिकाऱ्यांना
  58. 2:24हाताशी धरतात आणि काही वेळा सरळ जबरदस्ती
  59. 2:27करतात पण आता न्यायालयाने स्पष्ट सांगितले
  60. 2:31आहे की दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीवरून
  61. 2:33रस्ता देणे ही खूप गंभीर बाब आहे आणि
  62. 2:35त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे.
  63. 2:38मित्रांनो आता समजून घ्या की शेत रस्ता
  64. 2:41म्हणजे नेमके काय? अनेक लोकांना वाटते की
  65. 2:43मी वर्षानुवर्ष जातोय म्हणजे तो माझा
  66. 2:46कायदेशीर रस्ता झाला पण तसे नाही फक्त
  67. 2:48वापर झाला म्हणून कायमस्वरूपी हक्क तयार
  68. 2:51होत नाही त्यासाठी अनेक गोष्टी सिद्ध
  69. 2:53कराव्या लागतात जसे की त्या व्यक्तीकडे
  70. 2:55दुसरा पर्यायी मार्ग नाही हा रस्ता खरोखर
  71. 2:58आवश्यक आहे फक्त सोयीसाठी नाही त्या
  72. 3:00मार्गाचा वापर पूर्वीपासून सातत्याने होत
  73. 3:03होता याचे पुरावे आहेत आणि त्या
  74. 3:05रस्त्यामुळे जमीनच्या मालकाचे कमीत कमी
  75. 3:08नुकसान होणार आहे हे सगळे मुद्दे खूप
  76. 3:10महत्त्वाचे आहेत आता आता एक उदाहरण समजून
  77. 3:13घ्या. समजा एका शेतकऱ्याची जमीन आतमध्ये
  78. 3:15आहे आणि त्याच्याकडे बाहेर पडण्यासाठी
  79. 3:17कोणताही सरकारी रस्ता नाही. काही कायद्यां
  80. 3:20प्रवेश मार्ग मागू शकतो पण याचा अर्थ असा
  81. 3:23नाही की त्याला हवा तिथून रस्ता मिळेल. तो
  82. 3:25ज्या मार्गांनी मागणी करतो त्या मार्गाचा
  83. 3:27परिणाम काय होईल हे पाहिले जाते. जर त्या
  84. 3:30रस्त्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचे मोठे
  85. 3:32नुकसान होणार असेल तर अधिकारी पर्यायी
  86. 3:35मार्ग शोधू शकतात. कारण कायदा संतुलन
  87. 3:38ठेवतो एका व्यक्तीची गरज पूर्ण करताना
  88. 3:40दुसऱ्याच्या मालमत्तेवर अन्याय होऊ देता
  89. 3:42येत नाही. आता अनेक वेळा असे घडते की
  90. 3:45व्यक्तीकडे दुसरा रस्ता असतो पण तो थोडा
  91. 3:47लांब असतो मग तो शेजारच्या शेतातून जवळचा
  92. 3:50रस्ता मागतो आणि म्हणतो मी वर्षानुवर्ष
  93. 3:52इथून जातोय पण न्यायालयाने आता स्पष्ट
  94. 3:55सांगितले आहे की कायदा शॉर्टकट देत नाही.
  95. 3:58कायदा आवश्यक रस्ता देतो फक्त कमी
  96. 4:00अंतरासाठी दुसऱ्याच्या जमिनीवरून हक्क
  97. 4:02निर्माण होत नाही. हा खूप मोठा मुद्दा आहे
  98. 4:05कारण गावात अनेक वेळा सोयीचा रस्ता
  99. 4:07मिळवण्यासाठी लोक वाद घालतात. मित्रांनो
  100. 4:10आता समजून घ्या की महसूल अधिकारी कोणत्या
  101. 4:12गोष्टी तपासतात. पहिली गोष्ट म्हणजे
  102. 4:15पर्यायी मार्ग. पर्यायी मार्ग आहे का? जर
  103. 4:18दुसरा मार्ग उपलब्ध असेल तर दुसऱ्याच्या
  104. 4:20शेतातून रस्ता देण्याची गरज कमी होते आणि
  105. 4:23दुसरी गोष्ट म्हणजे त्या रस्त्याचा
  106. 4:25पूर्वीचा वापर सिद्ध होतो का यासाठी नकाशे
  107. 4:28पंचनामे जुने कागद गावातील साक्षीदार
  108. 4:31महसूल रेकॉर्ड यांचा विचार केला जातो.
  109. 4:34तिसरी गोष्ट म्हणजे रस्त्यामुळे कोणाचे
  110. 4:36किती नुकसान होणार आहे उदाहरणार्थ जर
  111. 4:39रस्ता विहरी जवळून जात असेल पाईपलाईन वरून
  112. 4:42जात असेल ठिबक सिंचन मोडणार असेल उभी पिके
  113. 4:45खराब होणार असतील तर अधिकारी ते
  114. 4:47दुर्लक्षित करू शकत नाहीत चौथी गोष्ट
  115. 4:50म्हणजे नैसर्गिक न्यायाचे तत्व पाळले गेले
  116. 4:52पाहिजे म्हणजे ज्याच्या शेतातून रस्ता
  117. 4:54जाणार आहे त्याला नोटीस दिली पाहिजे
  118. 4:57त्याची बाजू ऐकली पाहिजे त्याला पुरावे
  119. 4:59सादर करण्याची संधी दिली पाहिजे प्रत्यक्ष
  120. 5:02जागेची पाहणी झाली पाहिजे आणि कारणांसह
  121. 5:05लेखी आदेश दिला पाहिजे हे खूप महत्त्वाचे
  122. 5:08आहे कारण अनेक वेळा शेतकरी नोटीसकडे
  123. 5:10दुर्लक्ष करतात आणि नंतर एकतर्फी आदेश
  124. 5:13होतात मग लोक म्हणतात आम्हाला विचारलेच
  125. 5:16नाही पण कोर्ट विचारते तुम्ही नोटीसला हजर
  126. 5:19होता का तुम्ही हरकत दिली का म्हणून
  127. 5:21प्रत्येक शेतकऱ्याने नोटीस गंभीरपणे
  128. 5:23घ्यावी मित्रांनो आता आपण गावात घडणारी
  129. 5:26वास्तव परिस्थिती पाहूया अनेक वेळा दोन
  130. 5:29भावांमध्ये वाटणी होते आतली जमीन एका
  131. 5:31भावाकडे जाते बाहेरचा रस्ता दुसऱ्याकडे
  132. 5:33राहतो सुरुवातीला आपसात जाणे येणे सुरू
  133. 5:36असते पण नंतर वाद होतात आणि मग रस्त्याचा
  134. 5:39प्रश्न निर्माण होतो काही वेळा जमीन विकत
  135. 5:42घेताना लोक रस्त्याची खात्री करत नाहीत
  136. 5:44फक्त स्वस्थ मिळते म्हणून आतली जमीन घेतात
  137. 5:47आणि नंतर शेजारच्या शेतातून रस्ता मागू
  138. 5:49लागतात काही वेळा प्लॉटिंग करणारे लोक
  139. 5:52मुद्दामून रस्ता नसलेली जमीन घेतात आणि
  140. 5:54नंतर सरकारी दबाव टाकून रस्ता मिळवण्याचा
  141. 5:57प्रयत्न करतात त्यामुळे जमीन खरेदी करताना
  142. 6:00अधिकृत रस्ता आहे का हे तपासणे खूप आवश्यक
  143. 6:03आहे. मित्रांनो आता एक मोठा गैरसमज दूर
  144. 6:06करूया. अनेक लोक म्हणतात आम्ही 30
  145. 6:08वर्षांपासून जातोय म्हणजे रस्ता आमचा झाला
  146. 6:11पण फक्त तोंडी बोलून काही सिद्ध होत नाही.
  147. 6:14न्यायालय पुरावे मागते महसूल नकाशा मागते
  148. 6:17वापराचे रेकॉर्ड मागते आणि सर्वात
  149. 6:19महत्त्वाचे म्हणजे दुसरा पर्याय मार्ग आहे
  150. 6:22का? हे पाहते त्यामुळे फक्त गावात लोक
  151. 6:25म्हणतात म्हणून कायदेशीर हक्क तयार होत
  152. 6:27नाही. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट
  153. 6:29समजून घ्या. जर एखाद्याने तुमच्या शेतातून
  154. 6:32जबरदस्ती रस्ता काढण्याचा प्रयत्न केला तर
  155. 6:35तुम्ही काय कराल? सर्वप्रथम शांत रहा
  156. 6:38भांडण करू नका मारामारी करू नका कारण मग
  157. 6:41तुमच्यावरच गुन्हा होऊ शकतो त्याऐवजी
  158. 6:43तात्काळ लेखी हरकत द्या तहसीलदार तलाठी
  159. 6:46मंडळ अधिकारी ग्रामपंचायत पोलीस स्टेशन
  160. 6:49सर्वांना अर्ज द्या की माझ्या जमिनीवर
  161. 6:51बेकायदेशीर हस्तक्षेप सुरू आहे. दुसरी
  162. 6:54गोष्ट म्हणजे पुरावे जमा करा. फोटो
  163. 6:56व्हिडिओ नकाशे सातबारा फेरफार हे सर्व जतन
  164. 7:00करा कारण कोर्टात भावना नाही तर पुरावे
  165. 7:03चालतात तिसरी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांनी
  166. 7:05चुकीचा आदेश दिला तर त्यावर अपील करता
  167. 7:08येते का? उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी
  168. 7:11महसूल न्यायाधिकरण उच्च न्यायालय अशा
  169. 7:13विविध स्तरांवर आव्हान देता येते त्यामुळे
  170. 7:16तहसीलदारांचा आदेश अंतिम असतो हा गैरसमज
  171. 7:19आहे मित्रांनो. आता विहरीजवळच्या
  172. 7:21रस्त्याचा विषय समजून घ्या. अनेक वेळा
  173. 7:24शेतकऱ्याच्या विहिरी जवळून रस्ता काढला
  174. 7:26जातो त्यामुळे मोटार पाईपलाईनवर विद्युत
  175. 7:28जोडणी यांचे नुकसान होते काही वेळा अपघात
  176. 7:31होतात अशावेळी शेतकऱ्याला हरकत घेण्याचा
  177. 7:33पूर्ण अधिकार आहे कारण कायदा कमीत कमी
  178. 7:36नुकसान या तत्वावर काम करतो. म्हणजे जर
  179. 7:40दुसऱ्या बाजूने रस्ता देता येत असेल तर
  180. 7:42विहरी जवळून जबरदस्तीने रस्ता काढण्याची
  181. 7:45गरज नाही. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा
  182. 7:47म्हणजे सरकारी रस्ता आणि खाजगी क्षेत्र
  183. 7:49रस्ता यातला फरक अनेक वेळा लोक म्हणतात हा
  184. 7:53गावाचा रस्ता आहे पण महसूल नकाशात तो
  185. 7:55रस्ता नसतो. काही वेळा लोक वर्षानुवर्ष
  186. 7:58वापर करत असल्यामुळे तो सार्वजनिक रस्ता
  187. 8:00असल्याचा गैरसमज तयार होतो. पण अंतिम सत्य
  188. 8:03महसूल रेकॉर्ड मध्येच असते त्यामुळे
  189. 8:05अधिकृत नकाशा तपासणे खूप गरजेचे आहे.
  190. 8:08मित्रांनो 20 एप्रिल 2026 च्या निर्णयाचे
  191. 8:11महत्त्व समजून घ्या. या निर्णयाने स्पष्ट
  192. 8:13संदेश दिला की महसूल अधिकारी मनमानी करू
  193. 8:16शकत नाहीत. पूर्ण तपासाशिवाय रस्ता मंजूर
  194. 8:19करता येणार नाही आणि चुकीचे आदेश दिल्यास
  195. 8:22त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवरही येऊ शकते.
  196. 8:24यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
  197. 8:27मिळाला आहे. कारण पूर्वी अनेक वेळा
  198. 8:29दबावाखाली निर्णय घेतले जात असल्याचा
  199. 8:32तक्रारी होत होत्या पण आता न्यायालयाने
  200. 8:34स्पष्ट भूमिका घेतली आहे की मालमत्तेच्या
  201. 8:37हक्कावर परिणाम करणारे आदेश अत्यंत
  202. 8:39काळजीपूर्वक द्यावे लागतील. मित्रांनो
  203. 8:42आजकाल डिजिटल पुरावे महत्त्वाचे होत आहेत.
  204. 8:44गुगल मॅप, सॅटेलाईट फोटो ड्रोन इमेज
  205. 8:46यांचाही काही प्रकरणांमध्ये उपयोग होतो पण
  206. 8:49अंतिम महत्त्व महसूल रेकॉर्डलाच दिले जाते
  207. 8:52त्यामुळे अधिकृत कागदपत्रे व्यवस्थित
  208. 8:54ठेवणे खूप आवश्यक आहे. आता महिलांच्या
  209. 8:56नावावर असलेल्या जमिनीबद्दल बोलूया. अनेक
  210. 8:59वेळा महिलांना कायदेशीर माहिती नसल्याचा
  211. 9:01फायदा घेतला जातो. त्यांच्यावर दबाव टाकून
  212. 9:04रस्ते घेतले जातात. पण लक्षात ठेवा जमीन
  213. 9:07ज्याच्या नावावर आहे निर्णयाचा अधिकार
  214. 9:08त्याचाच आहे कोणालाही दबाव टाकण्याचा
  215. 9:11अधिकार नाही मित्रांनो आता आपण
  216. 9:13शेतकऱ्यांच्या काही मोठ्या चुका समजून
  217. 9:15घेऊया पहिली चूक म्हणजे तोंडी परवानगी
  218. 9:18देणे अनेक वेळा लोक म्हणतात जा हो काही
  219. 9:21दिवस वापरा आणि नंतर तोच व्यक्ती कायमचा
  220. 9:24हक्क सांगतो त्यामुळे कोणतीही कायमस्वरूपी
  221. 9:27गोष्ट लेखी ठेवा दुसरी चूक म्हणजे नकाशे
  222. 9:30तपासत नाहीत अनेकांना स्वतःच्या जमिनीचा
  223. 9:32अधिकृत नकाशाच माहित नसतो. तिसरी चूक
  224. 9:35म्हणजे नोटीसकडे दुर्लक्ष करणे चौथी चूक
  225. 9:38म्हणजे भावनेत येऊन भांडणे करणे आणि पाचवी
  226. 9:40चूक म्हणजे कोणताही कागद न वाचता सही करणे
  227. 9:43या चुका भविष्यात मोठा धोका निर्माण करतात
  228. 9:46मित्रांनो लक्षात ठेवा शेत म्हणजे फक्त
  229. 9:48माती नाही ती पिढ्यांची ओळख आहे घाम आहे
  230. 9:52संघर्ष आहे भविष्य आहे त्यामुळे शेताचा
  231. 9:55रस्त्याचा प्रश्न हा फक्त जाण्या येण्याचा
  232. 9:57प्रश्न नसतो तो हक्कांचा प्रश्न असतो आणि
  233. 10:00म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने कायदा समजून
  234. 10:02घेणे आवश्यक आहे कारण अज्ञानाचा फायदा
  235. 10:05नेहमी दुसरे लोक घेतात. गावात अनेक वेळा
  236. 10:08प्रभावशाली लोक गरीब शेतकऱ्यांवर दबाव
  237. 10:10टाकतात. काही वेळा महिलांना घाबरवले जाते.
  238. 10:13काही वेळा वृद्ध लोकांना चुकीची माहिती
  239. 10:15दिली जाते. काही वेळा कागदावर सही घेतली
  240. 10:18जाते. त्यामुळे जागरूक राहणे खूप गरजेचे
  241. 10:21आहे मित्रांनो. जर तुमच्या शेतातून कोणी
  242. 10:23जबरदस्तीने रस्ता काढत असेल तर लक्षात
  243. 10:26ठेवा. तुम्ही एकटे नाही कायदा तुमच्या
  244. 10:28सोबत आहे पण त्यासाठी योग्य वेळी योग्य
  245. 10:31पावले उचलावी लागतात लेखी पुरावे ठेवावे
  246. 10:34लागतात आणि शांतपणे कायदेशीर लढा द्यावा
  247. 10:36लागतो कारण कोर्ट आणि कायदा पुराव्यांवर
  248. 10:39चालतो आवाजावर नाही मित्रांनो आजचा सर्वात
  249. 10:42मोठा संदेश हा आहे की कोणाच्याही दबावाला
  250. 10:45घाबरू नका पण कायद्याचा आदर करा जर
  251. 10:48समोरच्या व्यक्तीला खरोखर गरज असेल तर
  252. 10:50मानवतेने विचार जर अन्याय होत असेल तर
  253. 10:53आपल्या हक्कासाठी उभे रहा कारण एकदा
  254. 10:55चुकीचा चा रस्ता तयार झाला की भविष्यात तो
  255. 10:58मोठा वाद बनू शकतो. त्यामुळे
  256. 11:00सुरुवातीपासून जागरूक राहणे आवश्यक आहे.
  257. 11:03शेवटी एवढेच सांगते की कायद्याची माहिती
  258. 11:05असलेला शेतकरी कधीही फसत नाही म्हणून
  259. 11:08सातबारा समजा नकाशा समजा महसूल प्रक्रिया
  260. 11:12समजून घ्या नोटीस समजून घ्या आणि सर्वात
  261. 11:14महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या हक्कांची
  262. 11:16जाणीव ठेवा. कारण आजच्या काळात जागरूक
  263. 11:19शेतकरी स्वतःची जमीन वाचवू शकतो आणि
  264. 11:21पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवू शकतो
  265. 11:23धन्यवाद

About this transcript

This page contains the full transcript of शेतातील रस्ता कोणाचा? | जुनी वहिवाट की बेकायदेशीर रस्ता? by कायद्याची बाराखडी ⚖️, generated from the public captions YouTube serves with the video. The transcript has 1,600 words across 265 segments, with the original timestamps preserved so you can click any line to jump to that moment in the embedded player.

What you can do with it

Use the transcript to take notes, quote the speaker, build a study guide, generate a summary with ChatGPT or Claude via the YouTube Summary tool, or export it as a timed subtitle file with YouTube to SRT. You can also re-open it in the transcriber to translate the transcript into 100+ languages.

Free YouTube transcript tool

YouTube2Text is a free YouTube transcript generator — no signup, no daily limit. Paste any YouTube link and get the full transcript instantly, with timestamps, click-to-jump, translation to 100+ languages, AI prompts for ChatGPT, Claude, and Gemini, and exports to TXT, SRT, VTT, or Markdown.